नरेंद्र मोदी  Sakal
देश

संकटातही संधी शोधू; नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

कधी काळी काँग्रेस पक्षाची ओळख असलेल्या खादीचा विसर काँग्रेस पक्षालाच पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी : 21व्या शतकातील हे तिसरे दशक संपूर्ण जगासाठी नवीन आव्हाने, अभूतपूर्व संकट घेऊन आले आहे. पण या अभूतपूर्व संकटाचे आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्याचे भारताने ठरवले आहे. हा निश्चय फक्त माझ्या एकट्याचा नाही तर, भारतातील १३० कोटी नागरिकांचा आहे, तुम्हा सर्वांचा आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये 7 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी वाराणसी येथे आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ( Prime Minister Narendra Modi Addresses Rally In Varanasi)

कधी काळी काँग्रेस पक्षाची ओळख असलेल्या खादीचा विसर काँग्रेस पक्षालाच पडला आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केला आहे. तुम्ही कधी या लोकांकडून ऐकले आहे का की, देशात तयार झालेल्या स्वदेशी वस्तूंचा वापर करा किंवा या वस्तूंचा प्रचार करा? नाही ना कारण त्यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. ते जर हे तुमचे मित्र असते तर, ते तुम्ही बनवलेली उत्पादने विकण्यासाठी पुढाकार घेतला असता पण तसे होताना दिसत नाहीये. ते वाराणसी येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

मोदी म्हणाले की, घोर परिवारवादी लोक व्होकल फॉर व्होकलवरूनही चिडतात. आज योग आणि आयुर्वेद जगभर लोकप्रिय झाले आहेत, पण हे घोर परिवारवादी योगाचे नाव घेणेही टाळतात असेदेखील मोदी यांनी सांगितले. भाजपने स्वच्छ भारत मिशन सुरू केले, 10 कोटींहून अधिक शौचालये बांधली. त्यामुळे गावातील गरीब, दलित, मागास कुटुंबातील भगिनींना सर्वाधिक फायदा झाला. वाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत नाही, घरात शौचालय नसेल तर, गरीब आईला किती त्रास सहन करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT