social-media 
देश

भारतीय लष्कर सज्ज, आपणही जबाबदारीने वागू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या कारवायांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यामुळे देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपणही जबाबदारिने वागायला हवे. इंडियन आर्मी मेम्स या फेसबुक पेजवरुन तसे आवाहन करण्यात आले आहे. 

- सोशल मिडियावर सध्या अनेक जोक्स, मिम्स व्हायरल होत आहे. परंतु, जरा थांबा, देशाचा आणि लष्कराचा विचार करा.
- आपण फेसबुक, व्हॉट्सऍप, ट्विटर आणि इंस्ट्राग्रामवरुन शेअर करत असलेले मेसेज काही क्षणांतच शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे, जर तुमचा मित्र सैन्यात असेल, तर त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याची माहिती देणारे कोणतेही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करु नका.
- स्थानिक अथवा राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील कोणतेही फोटो, व्हिडीओ किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नका
- भारतीय जवान किंवा सैन्यातील सामुग्रीसोबतचे सेल्फीही शेअर करू नका. शत्रूराष्ट्रांकडून भारतीय सोशल मीडियाचे मॉनिटरिंग करण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील सोशल मीडियावर शत्रूराष्ट्राची नजर आहे. 
- भारतीय विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा सरकारी कार्यालयाचे फोटो शेअर करू नका. 
- भारतीय जवानांसदर्भातील सेन्सेटीव्ह असा कुठलाही व्हिडीओ ग्रुपवर शेअर करू नका आणि तसं करणाऱ्यांनाही बजावून ठेवा. 
- स्वत: सतर्क राहा आणि काहीही अनुचित प्रकार होत असल्याची कुणकुण लागताच, स्थानिक सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधा.
- प्रवास करत असताना देशातील सुरक्षा जवानांनी आपले चेकिंग केल्यास, त्यांच्याशी हुज्जत घालू नका. विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा बस स्थानकावर CRPF जवानांना सहकार्य करा.  
- सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियम पाळा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT