Karad Airport
Karad Airport esakal
देश

विमानतळांवर वाजणार भारतीय संगीत; उड्डाण मंत्रालयाचे कंपन्यांना पत्र

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : येणाऱ्या काही दिवसात तुम्ही जर विमानाने प्रवास करणार असाल तर, विमानतळ (Indian Music In Flights) आणि टर्मिनल परिसरात तुम्हाला भारतीय संगीत (India Music) ऐकू येण्याची शक्यता आहे. कारण, सर्व विमान कंपन्यांना विमान उड्डाणांच्या ठिकाणी आणि टर्मिनल परिसरात भारतीय संगीत (Indian Music In Airport) वाजविण्याचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना पत्र पाठवले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्सने (ICCR) नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना भारतीय वाहकांनी चालवल्या जाणार्‍या विमानांमध्ये भारतीय संगीताचा प्रचार करण्याची विनंती करण्यात आली होती.त्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सर्व विमान कंपन्यांना भारतीय संगीत वाजविण्यावर विचार करण्यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. (Civil Aviation)

भारतीय विमान कंपन्या (India Airlines ) क्वचितच उड्डाणावेळी भारतीय संगीत वाजवतात, मात्र आपल्याकडे संगीताचा समृद्ध वारसा तसेच संस्कृती आहेत, त्यासोबतच अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असतो असं उड्डणा मंत्रालयाने पाठविलेल्या पक्षात नमूद करण्यात आले आहे. (Indian Music History)

गाड्यांचे कर्ण कर्कंश आवाज बंद होणार

काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गाड्यांच्या हॉर्नमध्ये (Vehicle Horn Sound) बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम बनवले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता विमानतळांसाठी भारतीय संगीत वाजविण्याबाबत विचार केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

SCROLL FOR NEXT