IRCTC News esakal
देश

IRCTC News : रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, नवीन सुविधा मिळणार

प्रवाशांच्या याच विचाराला अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेपण बऱ्याच सुधारणा करत असते.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railways Destination Alert : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशी बहुतांशवेळा रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. कारण रात्री वेळ कसा निघून जातो संमजत नाही. आणि झोप झाल्याने दिवस मोकळा मिळतो.

  • प्रवाशांच्या याच विचाराला अधिक सुखकर करण्यासाठी रेल्वेपण बऱ्याच सुधारणा करत असते. पुढील दोन वर्षात ट्रेन ४०० सेंमी अधिक वेगाने धावणार आहेत.

  • १५ ऑगस्ट २०२३ पासून ७५ अधिक शहरांशी रेल्वे जोडली जाणार आहे.

आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती नाही

आता रेल्वे आता वायफाय सुविधा सुरू करणार आहे. तर बहुतांश स्टेशन्सवर एस्कलेटर सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय आता रात्री कोणत्याही परिस्थितीत स्टेशन चुकू नये म्हणून एक खास सुविधा रेल्वे घेऊन येत आहे. पण यासाठी तुम्हाला ही सेवा विकत घ्यावी लागणार आहे.

प्रवासात नागरिकांना कोणताही ताण न घेता झोपता यावं म्हणून रेल्वेने ही सुविधा आणली आहे. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या स्टेशनच्या बरोबर २० मिनीट आधी उठाल. या सुविधेमुळे तुम्ही शांततेत झोपू शकाल आणि तुमचं उतरण्याचं स्टेशनही चुकणार नाही. रेल्वेच्या या सुविधेचं नाव 'Destinetion Alert Wake up Alarm' (डेस्टीनेशन अलर्ट वेक अप अलार्म) असं आहे.

तक्रारींनंतर सुविधेची योजना

रेल्वे लेट झाली आणि त्यामुळे प्रवाशाला झोप लागली अन् उतरण्याचं स्टेशन चुकलं अशा तक्रारी रेल्वेकडे बऱ्याच आल्याने ही सुविधा करण्याची योजना करण्यात आली. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वेचा चौकशी नंबर १३९ वरून घेता येईल.

२० मिनीट आधी वेक अप कॉल

ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी १३९ नंबरवर कॉ करून सेवेची विचारणा करावी. ही सुविधा रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत उपलब्ध असेल. या सेवेसाठी तुम्हाला तिकीटाव्यतिरीक्त अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.

कसा घ्यावा या सुविधेचा लाभ?

आयआरसीटीसीच्या डेस्टीनेशन अलर्ट वेक अप अलार्म साठी १३९ नंबरवर कॉल केल्यावर भाषा निवडावी. मग ७ आणि नंतर २ निवडावं. त्यानंतर १० आकडी PNR नंबर टाकावा आणि १ दाबून कंफर्मेशन द्यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT