Indias largest carmaker Maruti Suzuki to resume production at Manesar plant from May 12 
देश

दिलासादायक ! लॉकडाऊनमध्ये 'या' कार निर्माता कंपनीने घेतला मोठा निर्णय

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशात उद्योगधंदे बंद आहेत. परंतु अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या गाड्यांचं उत्पादन पुन्हा सुरू करणार आहे.

लॉकडाऊनदरम्यान देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी हे दिलासादायक वृत्त आहे. मारुती सुझुकीने हरयाणाच्या मानेसर येथील कारखान्यामध्ये प्रोडक्शन घेण्यास पुन्हा सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता .०६) याबाबत मारुती सुझुकीकडून माहिती देण्यात आली. यापूर्वी २२ एप्रिल रोजी हरयाणा सरकारने काही निर्बंधांसह मारुतीला मानेसर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण, त्यावेळी कंपनीने नकार दिला होता. मात्र, आता सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १२ मे पासून मानेसर कारखान्यातील प्रोडक्शन घेण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे.

लॉकडाऊमुळे बेरोजगारीचा पडलाय टॉप गियर; भारताचा बेरोजगारीचा दर...

जोपर्यंत कंपनीच्या सर्व वेंडर कंपन्यांना उत्पादनाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत गाड्यांचं उत्पादन सुरू करता येणार नाही. कारचं उत्पादन घेण्यासाठी अन्य अनेक घटकांची व साहित्याची आवश्यकता असते. त्यासाठी हजारो विक्रेत्यांना उत्पादन सुरू करावे लागेल. असं काही होण्याची सध्यातरी शक्यता नाही, कारण त्यांच्यातील अनेकजण रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला साहित्याचा सर्व संच मिळू शकत नाही. रिटेल दुकानेही अद्याप सुरू झालेली नाहीत. विक्री सुरू नसेल तर तुम्ही उत्पादन सुरू करु शकत नाही, असे सुरवातीला सांगत कंपनीने मानेसरमध्ये प्रोडक्शन सुरू करण्यास नकार कळवला होता. मात्र, आता लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक शहरांमध्ये निर्बंध शिथील झाल्यानंतर कंपनीने उत्पादन चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT