T-50 Tunnel Sakal
देश

Indias Longest Tunnel : देशातील सर्वांत लांब मालवाहतुकीसाठीचा बोगदा खुला; मोदींनी रेल्वे गाड्यांना दाखविला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाच वेळी विजेवर दोन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.

पीटीआय

श्रीनगर - देशातील सर्वांत लांब मालवाहतुकीसाठीचा बोगदा मंगळवारी अखेर खुला झाला. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आज या गाडीला हिरवा कंदील दर्शविला. पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी विजेवर दोन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.

यातील एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान धावल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते ४८.१ किलोमीटर लांबीच्या बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगल्दान या विभागाचेही उद्‍घाटनही करण्यात आले.

या बोगद्याची लांबी १२.७७ किलोमीटर एवढी असून तो ‘टी-५०’ या नावानेही ओळखला जातो. हा बोगदा खरी- सुंबेर सेक्शनचाच भाग आहे. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे आता बारामुल्ला ते सांगल्दानदरम्यान रेल्वे धावू शकेल. ही गाडी बनिहाल मार्गे धावणार आहे.

बनिहाल- खेरी- सुंबेर- सांगदाल विभागामध्ये अकरा बोगद्यांची उभारणी करण्यात आली असून त्यातील ‘टी-५०’ या बोगद्याच्या निर्मितीचे काम खूप आव्हानात्मक होते. या बोगद्याचे काम हे साधारणपणे २०१० मध्ये सुरू झाले त्यानंतर हा बोगदा पूर्ण व्हायला चौदा वर्षांचा अवधी लागला.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ‘टी-५०’ या मुख्य बोगद्यालाच समांतर असा एक बोगदा तयार करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्यातून स्वतःची सुटका करून घेता येईल.

आत पाण्याची सोय

या बोगद्यामध्ये अचानक एखाद्या वाहनाला आग लागली तर ती विझविता यावी म्हणून दोन्ही बाजूला पाण्याचे पाइप बसविण्यात आले आहेत. या पाईपला ३७५ मीटरच्या अंतराने वेगळ्या व्हॉल्वची सोय करण्यात आली असून त्यातून आगीवर पाण्याच्या फवाऱ्याचा मारा करण्यात येईल. सध्या बारामुल्ला ते बनिहालदरम्यान आठ विजेवरील गाड्या धावतात त्यातील चार गाड्यांचा टप्पा हा सांगल्दानपर्यंत वाढविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT