देश

बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान

सकाळ डिजिटल टीम

बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे. 

न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात. 

दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेहरा सुजला, दात तुटले, मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं? Viral Video

Jalna News: पोर्टल बंद झाल्याने हरभऱ्याची खरेदी रखडली; अंबड तालुक्याच्या हारतखेडा केंद्रावर विक्रीअभावी हजारो क्विंटल माल पडून

Latest Marathi News Live Update: खडक पोलिसांची फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई

Jalna News: किनगाव-रोहिलागड रस्त्याची दुरवस्था; रस्त्यावर जीवघेणे खड्डे, वेळेचा अपव्यय, वाहनचालकांना मनस्ताप

Android Virus Alert : तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला व्हायरसचा धोका! सरकारने दिला इशारा; एक चूक अन् सगळं होईल हॅक, पाहा सुरक्षित कसे राहाल?

SCROLL FOR NEXT