Indo-Pacific region should inclusive Narendra Modi Boris Johnson bilateral talks delhi
Indo-Pacific region should inclusive Narendra Modi Boris Johnson bilateral talks delhi  sakal
देश

हिंद- प्रशांत क्षेत्र सर्वसमावेशक हवे; नरेंद्र मोदी- बोरिस जॉन्सन द्विपक्षीय चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिंद- प्रशांत क्षेत्र मुक्त, खुले, सर्वसमावेशक आणि नियमाधारीत असावे यावर यासाठी भारत आणि ब्रिटन आग्रही असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज केले. तर, हुकूमशाही आक्रमकतेचा धोका वाढल्याने हिंद प्रशांत क्षेत्र खुले आणि मुक्त ठेवण्यासाठी उभय देशांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दुजोरा देताना या क्षेत्राचे सामरिक महत्त्व अधोरेखित केले.

भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर बोलताना प्रशांत भारत क्षेत्रातील खुलेपणावर भर दिला. यावेळी, भारत आणि ब्रिटनरम्यान मुक्त व्यापार करार या वर्षभरात मार्गी लागेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच भारताच्या नॅशनल हायड्रोजन मिशनमध्ये सहभागासाठी ब्रिटनला आवाहन केले. गुजरातच्या भेटीनंतर ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन काल दिल्लीत पोहोचले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांची हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा झाली. यात व्यापार, द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक, सुरक्षा, रशिया युक्रेन युद्धानंतरची परिस्थिती, मुक्त प्रशांत भारत क्षेत्र यासह मलेरियावरील लस विकसित करणे, लढाऊ जेट विमान निर्मितीमध्ये भारत, ब्रिटनची भागीदारी यासारख्या मुद्द्यांचा दोन्ही नेत्यांच्या चर्चेमध्ये समावेश होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले ...

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनच्या पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, की मुक्त व्यापारासाठीच्या करारावर दोन्ही देश काम करत असून या वर्षाअखेरीस हा करार मार्गी लावण्याचे ठरविण्यात आले आहे. संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान, आरेखन आणि विकास या क्षेत्रात दिलेला पाठिंबा स्वागतार्ह आहे. राष्ट्रीय गुंतवणूक वाहिनीत ब्रिटिश कंपन्यांच्या गुंतवणुकीचे स्वागत असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान जॉन्सन म्हणाले ...

पंतप्रधान जॉन्सन यांनी सध्याच्या आव्हानात्मक काळात भारत आणि ब्रिटन या दोन लोकशाही देशांचे संबंध महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील भागिदारीवर मोदींशी चर्चा झाली झाली असल्याचे सांगताना जॉन्सन म्हणाले, की मागील वर्षभरात अनियंत्रित सत्ताधाऱ्यांची आक्रमकता आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारत प्रशांत क्षेत्र खुले आणि मुक्त राखण्याच्या दृष्टीने इंग्लंड आणि भारताचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

तेंडुलकर, अमिताभ असल्याचा भास

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींचा हिंदीत ‘दोस्त’असा उल्लेख केला. तसेच भारत दौऱ्यात झालेल्या स्वागतामुळे आपण भारावलो असून आपल्याला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन असल्याचा भास होतो आहे, अशी मिश्‍कील टिप्पणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT