देश

अधिकाऱ्याला बॅटने मारणाऱ्या भाजप आमदाराला अखेर अटक

वृत्तसंस्था

इंदूर : भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे चिरंजीव आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी दबंगगिरी करीत महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन बुधवारी सायंकाळी त्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

आज (ता.26) सकाळी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गंजी कम्पाउंड येथे जीर्ण इमारत पाडण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक पोचले होते. या धोकादायक इमारतीत पाच कुटुंबं राहत होती. या पाचही कुटुंबांनी इमारत रिकामी केली होती. मात्र, एक भाडेकरू अधिकाऱ्यांशी वाद घालू लागला होता. यादरम्यान इंदूरचे आमदार आकाश विजयवर्गीय तेथे पोचले. त्या वेळी, "आपण पाच मिनिटांत इथून गेला नाही, तर आपली जबाबदारी राहील,' असे ते म्हणाले.

यादरम्यान त्यांनी जेसीबीची किल्लीदेखील काढली. तेव्हा महापालिकेचे अधिकारी बाजूला हटत नसल्याचे पाहून आकाश यांनी हातातील बॅट त्यांच्यावर उगारली. बॅटने त्यांनी अधिकाऱ्यास पळवून लावत मारहाण करण्यास सुरवात केली. या वेळी नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार आकाश हे कोणाचेही ऐकत नव्हते. दरम्यान, मध्य प्रदेशचे मंत्री जितू पटवारी यांनी आकाश विजयवर्गीय यांच्या "दबंगगिरी'वर टीका केली आहे. ते म्हणाले की, आजच्या घटनेवरून भाजप घटनेला मानत नाही, असे दिसते. बंगालमध्येदेखील त्यांच्या वडिलांनी हिंसेला अशाच प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. आता मुलाचेही तसेच वर्तन आहे.

दुसरीकडे भाजपने आकाश विजयवर्गीय यांची पाठराखण केली आहे. भाजपचे नेते हितेश वाजपेयी म्हणाले की, व्हिडिओत जे दाखविले आहे; त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. हे अधिकारी 25-50 हजारांची लाच घेऊन अतिक्रमण करायला लावतात आणि पाऊस पडताच ते काढण्यासाठी तेथे पोचतात. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश विजयवर्गिय यांना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT