PM Modi esakal
देश

Pm Modi : घुसखोर संधी हिरावून घेत आहेत; पश्‍चिम बंगालमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

‘‘तृणमूल काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करण्यासाठी बेकायदा स्थलांतर करणाऱ्यांना मदत करत आहे,’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर केला.

सकाळ वृत्तसेवा

काकद्वीप : ‘‘घुसखोरीमुळे पश्‍चिम बंगालच्या सीमा भागात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असून, घुसखोरी करणारे भूमिपुत्रांच्या संधी हिरावून घेत आहेत,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पश्‍चिम बंगालमधील काकद्वीप येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये केला.

‘‘तृणमूल काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करण्यासाठी बेकायदा स्थलांतर करणाऱ्यांना मदत करत आहे,’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर केला. शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत, त्यांना भारताचे नागरिकत्व देणाऱ्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याला’ (सीएए) तृणमूलचा विरोध का आहे? असा सवालही त्यांनी सा सभेमध्ये विचारला.

मोदी यांनी पश्‍चिम बंगालमधील मतुआ समुदायाचा उल्लेखही आवर्जून केला.‘‘मतुआंसह आणि हिंदू समाजातील लोकांनी पश्‍चिम बंगालमध्ये राहूच नये, अशी पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारची इच्छा आहे, पण मतुआ समुदायातील लोकांना सन्मानाने भारतीय नागरिकत्व देण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडी पश्‍चिम बंगालला विकासाच्या मार्गावर नेण्याऐवजी अधोगतीला नेत आहेत असे ते म्हणाले.

घटनेवर विरोधकांचा हल्ला

‘‘एका विशिष्ट समुदाच्या लांगूलचालनासाठी तृणमूल सरकारने दलित व मागासवर्गींना अधिकार देणाऱ्या राज्यघटनेवर थेट हल्ला केला आहे. या वर्गांचे आरक्षण हिरावून घेऊन मुस्लिमांना चुकीच्या पद्धतीने ओबीसी आरक्षण दिले,’’ असा आरोप पंतप्रधानांनी केला. कलकत्ता उच्च न्यायालयाने २२ मे रोजी हे आरक्षण बेकायदा ठरवत रद्द केले होते त्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने न्यायालयाचा निर्णयही अमान्य केला व मुस्लिमांमध्ये या निर्णयाबाबत चुकीची माहिती पसरवत त्यांची दिशाभूल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT