देश

Congress Meeting: हरियानातील पराभवाचा नेत्यांना धसका! काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; मराठा-ओबीसींबाबत घेतला मोठा निर्णय

मराठा आणि ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. हरियानाच्या निवडणुकीत झालेल्या पराभाचा काँग्रेस नेत्यांनी धसका घेतला आहे.

बैठकीत नेमकं काय झालं?

हरियानातील पराभवाचा काँग्रेस नेत्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा हरियाना होऊ द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणायचंच आहे, अशा सूचना काँग्रेसच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. यासाठी मराठा आणि ओबीसी समाजाबाबत विशेष रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती सामच्या सुत्रांकडून मिळते आहे.

महाराष्ट्रात आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादाचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसंच नेतृत्व सध्या अलर्ट मोडवर आलं आहे. त्यामुळं "मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांत समन्वय राहील याची काळजी घ्या" अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ नेतृत्वाकडून राज्यातील नेत्यांन देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT