air-india
air-india 
देश

Women’s Day 2019 : आज एअर इंडियाच्या सर्व विमानांची धूरा महिला पायलट्सकडे

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली -  आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा अनोखा सन्मान केला आहे. आज एअर इंडियाच्या दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमानांच्या पायलट केवळ महिला असणार आहेत. त्याचबरोबर विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे. यानिमित्ताने एअर इंडियाच्या महिला कर्मचारी जागतीक स्तरावर एव्हिएशन क्षेत्रात आपला ठसा उमटवतील असेही त्या म्हणाल्या आहेत.

त्यामुळे आज एअर इंडियाच्या दिल्ली-सिडनी, मुंबई-लंडन, दिल्ली-रोम, दिल्ली-लंडन, मुंबई-दिल्ली-शांघाई, दिल्ली-पॅरिस, मुंबई-नेवार्क, मुंबई-न्यूयॉर्क, दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-वॉशिंग्टन, दिल्ली-शिकागो आणि दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को या विमानांची संपूर्ण धुरा ही उच्च प्रशिक्षित महिलांच्या हाती असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT