देश

संजयकुमार मिश्रा "ईडी'च्या प्रमुखपदी नियुक्त 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : आयआरएस अधिकारी संजयकुमार मिश्रा यांना अतिरिक्त कार्यभारासह ईडी (सक्तवसुली संचालनालय)च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. एका शासकीय आदेशान्वये नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर कॅडरच्या 1984 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी मिश्रा यांना ईडीत मुख्य विशेष संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.

त्यांना तीन महिन्यांसाठी ईडीच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मिश्रा हे मावळते कर्नल सिंह यांची जागा घेणार असून, त्यांचा कार्यकाळ उद्या (ता. 28) रोजी संपणार आहे. सिंह हे केंद्रशासित प्रदेशच्या कॅडरच्या 1984 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी ईडीच्या संचालकपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मुख्य प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत असणारे संजयकुमार मिश्रा यांचा केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवपदाच्या यादीत समावेश नव्हता. त्यामुळे त्यांना अतिरिक्त प्रभारासह ईडीचे संचालक म्हणून नेमण्यात आले आहेत. मिश्रा यांचा लवकरच यादीत समावेश केला जाईल आणि त्यानंतर स्वतंत्ररीत्या ईडीच्या प्रमुखपदाचा कार्यभार सोपवला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ईडीचे संचालकपद हे केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवपदाच्या रॅंकबरोबरीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT