mahua moitra
mahua moitra sakal
देश

अरूणाचल प्रदेश कचऱ्याचा ढीग आहे काय? महुआ मोईत्रा यांचा सवाल

मंगेश वैशंपायन

आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना सायंकाळी वेळेआधी मैदानाबाहेर काढण्याचा ‘खेळ‘ संजीव खिरवार व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा या आयएएस दाम्पत्याला महागात पडला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील त्यागराज क्रीडागारावर आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना सायंकाळी वेळेआधी मैदानाबाहेर काढण्याचा ‘खेळ‘ संजीव खिरवार व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा या आयएएस दाम्पत्याला महागात पडला आहे. खिरवार यांची सपत्नीक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना लदाखमध्ये तर दुग्गा यांना अरूणाचल प्रदेशात पाठविण्यात आले आहे. दुग्गा यांची अरूणाचल प्रदेशात बदली करणे हा त्या राज्याचा अपमान असल्याची घणाघाती टीका तृणमूल कॉंग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी केली आहे. दुग्गा यांची केंद्राने अरुणाचल प्रदेशात बदली केली. ईशान्य भारताबाबत पोकळ सहानुभूती दाखवणाऱ्या केंद्र सरकारला अरूणाचल प्रदेश हा ‘दिल्लीतील कचरा‘ टाकण्यासाठी कचऱ्याचा ढिगारा वाटतो का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू व अरुणाचल चे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गृह मंत्रालयाद्वारे अरुणाचल प्रदेश बरोबर कचऱ्याच्या ढिगासारखा वागणूक केल्याबदद्ल विरोध करावा असेही मोइत्रा यांनी आवाहन केले.

दिल्ली-लदाख ३४०० किमी !

खिरवाल पतीपत्नीच्या बदलीची बातमी जाहीर होताच सोशल मिडीयावर दिल्ली ते लदाख किती किलोमीटर अंतर आहे हे पाहणाऱयांची झुंबड उडाली. अधिकृत माहितीनुसार दिल्ली व लदाख यांच्यातील अंतर ३ हजार ४५८ किमी असून रस्त्याने गेले तर हे अंतर जाण्यास सध्या ६५ ते ७० तास लागतात. विमानाद्वारे सलगपणे हा प्रवास नाही व तो करण्यासाठीही किमान २०-२२ तास लागतात. दिल्ली-लदाख विमानाचे तिकीट प्रत्येकी २० ते २५ हजार रूपये आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश आज जारी केले. दोघेही पतीपत्नी १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या त्यागराज मैदानात रोज सायंकाळी साडेसहाला मैदानाचे सुरक्षारक्षक येथे सराव करणाऱया खेळाडू व प्रशिक्षकांना बाहेर हाकलून देत. कारण खिरवाल दाम्पत्य कुत्र्याला फिरविण्यासाठी येणार आहेत असे हे सुरक्षारक्षक बिनदिक्कतपणे सांगत. आदी रात्री साडेआठ-नऊपर्यंत सराव करायला पळत असे. मात्र, आता साडेसहा-सातलाच आपल्याला मैदानाबाहेर जावे लागते, अशी तक्रार खेळाडू व प्रशिक्षकांनी केली होती. तब्बल एक आठवडा याबाबतची पाहणी करून खातरजमा केल्यावर याबाबत वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर खळबळ उडाली. गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला. तो त्यांनी त्वरित सादर केला होता. खिरवाल यांनी याबाबत सारवासारव केली व या आरोपाचा इन्कार केला. तरी आपण कुत्र्याला फिरविण्यासाठी या मैदानावर जातो हे त्यांनी मान्य केले होते. दिल्लीसह केंद्रशासित प्रदेशांतील आयएएस व आयपीएस अधिकाऱयांच्या नियुक्त्या व बदल्या यांचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे.

त्याचवेळी मैदानाच्या देखरेखीचे काम असलेल्या दिल्ली सरकारनेही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सारी मैदाने खेळाडूंसाठी रात्री १० पर्यंत खुली रहातील, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने या वृत्ताची गंभीर दखल घेऊन खिरवार यांना काल चौकशीसाठी पाचारण केले होते. सुरक्षा रक्षक, खेळाडू व प्रशिक्षक यांच्या चौकशीत खिरवार यांच्याविरूध्द या तक्रारीत तथ्य आढळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT