Narendra Modi 
देश

मोदींबाबतची माहिती देणे अशक्‍य

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांकडून झालेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या घटना आणि त्यांना देण्यात आलेली 'क्‍लीन चिट' आदींची माहिती देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज स्पष्ट नकार दिला. याबाबतच्या माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी आयोगाकडे असलेल्या स्रोतांचा अपव्यय होईल, असे कारण आयोगाने दिले आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत (आरटीआय) निवडणूक आयोगाकडून ही माहिती मागविण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींकडून झालेल्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांमध्ये त्यांना आयोगाकडून क्‍लीन चिट देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय एकमताने झाला नव्हता, तर त्या वेळी एका आयुक्तांनी विरोधी मते मांडली होती. याबाबतची माहिती देण्यासही आयोगाकडून नकार देण्यात आला.

पीटीआयच्या पत्रकाराने आरटीआयद्वारे आयोगाकडून ही माहिती मागितली होती. आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी विभागीय पातळीवर निकाली काढण्यात आल्या होत्या. याबाबतची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. तसेच, अशा प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण करणे, हा आयोगाकडे असलेल्या स्रोतांचा अपव्यय ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT