CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

IPL 2026 CSK vs PBKS Marathi Cricket News : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आयुष म्हात्रेने जबरदस्त खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १८ वर्षीय या युवा फलंदाजाने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर आक्रमण करत ७३ धावांची शानदार खेळी साकारली आणि चेन्नई सुपर किंग्सला मोठा स्कोअर उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.
AYUSH MHATRE CREATES IPL HISTORY

AYUSH MHATRE CREATES IPL HISTORY

esakal

Updated on

IPL 2026 Chennai Super Kings vs Punjab Kings Marathi Update: संजू सॅमसनला पुन्हा अपयशी झालेलं, फॅन्सला पाहावे लागेल. चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर १८ वर्षीय आयुष म्हात्रेने ( Ayush Mhatre) चेपॉक स्टेडियमवर विक्रमी खेळी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह तो पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना नडला आणि CSK चा डाव भक्कमस्थितीत आणला. १९ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांमध्ये आयुषने ( ७३ धावा) तिसरे स्थान पटकावले. पहिल्या दोन क्रमांकावर वैभव सूर्यवंशी ( १०३ धावा वि. गुजरात टायटन्स, २०२५ ( १४ वर्ष व ३२ दिवस)) आणि आयुष ( ९४ धावा वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १७ वर्ष व २९१ दिवस) ) हे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com