Jacqueline Fernandez  
देश

२०० कोटी वसुली प्रकरण; जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर हजर

काही दिवसांपूर्वीच जॅकलिनला मुंबई विमानतळावरुन परत पाठवण्यात आलं होतं.

स्वाती वेमूल

२०० कोटी वसुलीच्या प्रकरणात ईडीनं ED समन्स बजावल्यानंतर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस Jacqueline Fernandez चौकशीसाठी ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात हजर झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जॅकलिनला मुंबई विमानतळावरुन परत पाठवण्यात आलं होतं. ती दुबईला निघाली होती. पण २०० कोटींच्या वसुली प्रकरणात तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आलं असल्यानं ती देश सोडून जाऊ शकत नाही असं सांगत ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला विमानतळावरुन परत पाठवलं होतं. त्यानंतर ईडीनं तिला चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं आहे.

सुकेश चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत मिळून जॅकलिनवर २०० कोटी रुपये वसूल करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याबातीत आरोपपत्रही दाखल करण्यात आलेलं आहे. सुकेश चंद्रशेखरनं दिल्लीत एका व्यवसायिकाच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये वसूल केले होते. त्यानंतर हवालाच्या मार्फत या पैशांची फेरफार करण्यात आली आणि नंतर क्रीप्टो करन्सी खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरण्यात आल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकरणात सुकेश चंद्रशेखरनं जॅकलिन फर्नांडीसला १० लाखांपेक्षा जास्त किंमतीचे गिफ्ट्स दिले असल्याचं ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. तसंच सुकेश हा जेलमधून जॅकलिनच्या संपर्कात होता आणि तो जामिनीवर सुटला तेव्हा ते दोघं एकत्र हॉटेलमध्ये राहिले होते असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT