esakal
देश

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Jacqueline Fernandez Case : जॅकलीन फर्नांडिस फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहे.

Mayur Ratnaparkhe

 Delhi High Court Dismisses Jacqueline Fernandez’s Petition : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला दिल्ली उच्च न्यायलयाकडून जबरदस्त झटका बसला आहे. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिच्याविरोधात दाखल झालेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

जॅकलीनने अंमलबजावणी संचालनालयाचे दुसरे पुरवणी आरोपपत्र व दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असलेली कार्यवाही रद्द करण्याची विनंती देखील केली होती. मात्र न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी तिच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

सुनावणीदरम्यान ईडीच्या वकिलांनी याचिकेला विरोध केला आणि सांगितले की, जॅकलीनच्या याचिकेत काहीही तथ्य नाही. विशेष न्यायालयानेही फिर्यादी तक्रारीची दखल घेतली होती आणि प्रथमदर्शनी आरोप खरे वाटत होते. दखल घेण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आलेले नाही, असेही वकिलांनी सांगितले.

जॅकलीन फर्नांडिस फसवणूक करणाऱ्या सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहे. ती या प्रकरणात चौकशासाठी ईडीसमोरही हजर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT