Jai Anant Dehadrai TMC leader Mahua Moitra  
देश

महुआ मोईत्रा पुन्हा अडचणीत! एक्स बॉयफ्रेंडवर पाळत ठेवल्याचा आरोप; CBI चौकशी होणार?

Mahua Moitra carrying out illegal surveillance on her ex boyfriend तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये. पण, पुन्हा एकदा महुआ मोईत्रा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीये. पण, पुन्हा एकदा महुआ मोईत्रा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांचा कधीकाळी सहकारी असलेल्या एका वकीलाने मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

महुआ मोईत्रा यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाचे वकील जय आनंद देहाद्राई यांनी आरोप केलाय की, टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांनी आपल्या माजी प्रियकरावर पाळत ठेवली आहे. देहाद्राई यांच्या या आरोपामुळे महुआ यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता व्यक्त केली जातीये. (Advocate Jai Anant Dehadrai Trinamool Congress leader of carrying out illegal surveillance on her ex boyfriend with help from senior cops in West Bengal)

देहाद्राई यांनी यासंदर्भात एक पत्र सीबीआय संचालकांना लिहून तक्रार केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, महुआ या फोन नंबरच्या मदतीने त्यांच्या जुन्या प्रियकरांना ट्रॅक करत आहेत. त्यांनी या कामासाठी पश्चिम बंगालच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचा मोईत्रा यांचा इतिहास राहिला आहे.

मोईत्रा यांनी २०१९ मध्ये सुहान मुखर्जी या व्यक्तीवर पाळत ठेवली आहे. मोईत्रांनी मला सांगितलं होतं की त्या त्यांच्या जु्न्या प्रियकरावर पाळत ठेवत आहेत. कारण, त्यांना संशय आहे त्याचे एका जर्मन महिलेशी संबंध आहेत. माझ्याकडे यासंदर्भात स्क्रीनशॉट देखील आहेत, असं वकील म्हणाले.

वकील देहाद्राई म्हणाले की, मला हे कळाल्यानंतर आश्चर्य वाटलं की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने मोईत्रा यांनी त्यांच्या माजी प्रियकराचे कॉल डिटेल्स रिकॉर्ड मिळवले आहेत. प्रियकराशी संपर्क ठेवलेल्या सर्व जणांची त्यांच्याकडे माहिती आहे. लोकशनची देखील माहिती त्यांना दिली जात होती. (Latest Marathi News)

दरम्यान,या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यावर महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. मी गृह मंत्रालयाला आग्रह करते की भारतातील सर्व एक्स बॉयफ्रेंड्स यांच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी एका स्पेशल सीबीआय डायरेक्टरची नियुक्ती केली जावी. मात्र, काही तासांतच त्यांनी ही पोस्ट डिलिट केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT