
१४ वर्षांचा प्रतिभाशाली फलंदाज वैभव सूर्यवंशीची बॅट सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी इंग्लंडमध्ये तळपत आहे. सध्या भारताचा युवा संघ १९ वर्षांखालील इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळत असून या मालिकेत वैभव सूर्यवंशी अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे.
त्याने वॉर्सेस्टरला झालेल्या चौथ्या वनडेत शनिवारी (५ जुलै) खणखणीत शतकही ठोकले. त्याचे हे शतक विश्वविकमी देखील ठरले. त्याने शतकानंतर बीसीसीआयशी बोलताना त्याच्या भावना मांडल्या आहेत.