Gig Workers sakal
देश

Rajasthan : ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग वर्कर्स युवकांना राजस्थान सरकारचा मोठा दिलासा

ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी संबंधित गिग वर्कर्ससाठी कल्याण योजनेचे विधेयक संमत करणारे राजस्थान पहिले राज्य

सकाळ वृत्तसेवा

जयपूर - राजस्थान सरकारने ओला, स्वीगी, उबर, झोमॅटो या सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी गिग वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या लाखो युवकांना मोठा दिलासा दिला आहे. या गिग वर्कर्सचे हित जपण्यासाठी त्यांना सामाजिक सुरक्षा दिली जाणार आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी राज्य विधानसभेत गिग कर्मचारी (नोंदणी व कल्याण) विधेयक २०२३ संमत केले.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपजिविका चालवणाऱ्या लाखो गिग वर्कर्सच्या कल्याणासाठी विधेयक संमत करणारे राजस्थान देशातलं पहिलं राज्य बनलं आहे. या माध्यमातून बनणाऱ्या कायद्यानुसार गिग कर्मचारी कल्याण मंडळाची स्थापना केली जाईल. याच बरोबर राजस्थान प्लॅटफॉर्मवर आधारित गिग कर्मचारी सामाजिक सुरक्षा आणि कल्याण निधीचीही स्थापना केली जाईल.

हे मंडळ प्लॅटफॉर्म आधारित गिग वर्कर्सची नोंदणी करेल. याच बरोबर नोंदणीकृत गिग वर्कर्सच्या सामाजिक सुरक्षेच्या योजनांची देखरेख मंडळाच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत केली जाईल, तसंच या योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला हे मंडळ आपल्या शिफारसी देणार आहे.

या योजनांचा फायदा सर्व गिग वर्कर्सना होत आहे की नाही आणि त्यांची कामाची स्थिती चांगली आहे की नाही याचीही काळजी हे मंडळ घेईल. गिग वर्कर्सच्या अधिकारांबाबतच्या तक्रारी आणि अधिनियमांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्द्यांचीही काळजी हे मंडळ घेईल.

गिग वर्कर्सच्या नोंदणीसाठी ऍग्रीगेटर अधिनियम लागू झाल्याच्या ६० दिवसांच्या आत या गिग वर्कर्सचा डेटा राज्या सरकारला देण्यात येणार आहे. या ऍग्रीगेटर्सची माहिती आपल्या वेब पोर्टलवरही राज्य शासनाकडून जाहीर केली जाईल. या कायद्यानुसार गिग वर्कर्सना राज्य सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा मिळेल आणि गिग वर्कर्सना आपल्या तक्रारींच्या सुनावणीचीही संधी मिळेल.

या मंडळात गिग वर्कर्सनाही प्रतिनिधीत्व दिले जाईल. त्या द्वारे ते आपल्या कल्याणासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णय प्रक्रियेतही सहभागी होऊ शकतील. गिग वर्कर्सच्या तक्रारींसाठी निवारण यंत्रणेचीही स्थापना करण्यात येणार असून तिथे व्यक्तीशः किंवा ऑनलाइन अर्ज करुन तक्रारी दाखल करता येतील.

सध्याच्या आर्थिक स्थितीत कमी कौशल्य असलेल्या युवकांना गिगच्या कामातून रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी आहेत. अर्थव्यवस्था आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रांना हातभार लावूनही गिग वर्कर्सना अद्याप कामगार कायद्यांच्या अंतर्गत संरक्षण नाही. आता नव्या कायद्यानुसार गिग वर्कर्सच्या हिताचे संरक्षण होईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षाही प्राप्त होईल.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी २०२३-२०२४ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देणे, त्यांचे शोषण थांबवणे आणि त्यांच्यासाठी कल्याण कायदा आणण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर गिग वर्कर्स कल्याण आणि विकास निधीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूदही केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT