S Jaishankar 
देश

तालिबानने शब्द पाळला नाही, काबूलमध्ये स्थिती गंभीर - एस जयशंकर

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीची माहिती दिली. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही बैठक घेतली. संसद भवनामध्ये आयोजित बैठकीत जयशंकर यांच्याशिवाय राज्यसभेचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हेसुद्धा उपस्थित होते.

सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती ही गंभीर असल्याचं म्हटलं आहे. भारत सरकार अफगाणिस्तानमधील लोकांसोबत आहे. तालिबानने दोहामध्ये झालेल्या चर्चेतील अटीचे उल्लंघन केलं आहे. सध्या सरकार अफगाणिस्तामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय परराष्ट्र सचिवांनी अफगाणिस्तानातील स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.

आतापर्यंत 15 हजार लोकांनी भारतातील हेल्प डेस्कशी संपर्क केला. अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रपती घनी यांनी देश सोडल्यानंतर लष्कराने शरणागती पत्करली. तालिबानसोबत चर्चा करण्याबाबत सरकारने म्हटलं की, भारत आणि जगाने सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे. अजुन चीन, रशिया, अमेरिकेनेसुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

केंद्राने बोलावलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, द्रमुक नेते टीआर बालू, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, अपना दलाच्या नेता अनुप्रिया पटेल यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

Ganeshotsav 2025: ढोल-ताशा सरावासाठी तयार आहात? 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Akola Elections: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम; इच्छुकांमध्ये विविध प्रतिक्रिया

राज्य उत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’ नको

'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT