Viral Video Esakal
देश

Viral Video: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने सिग्नलला थांबवली गाडी, अन् आश्चर्याने पाहू लागले सगळे.. व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video: झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन रस्त्यावरून जात असताना, लोक त्याच्याकडे काहीतरी विचित्र दिसल्यासारखे बघत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

सोशल मिडीयावर अनेकदा झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. अनेकदा ते सायकल चालवत काम करतात. कधी पावसात गाडी बंद पडल्यानंतर गाडी ढकलत नेताना दिसतात, तर कधी त्यांच्या जगण्याचा संघर्ष दिसून येतो. पण, आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

साधारणपणे, बाइकवर होम डिलिव्हरी देणारे फूड डिलिव्हरी ॲप Zomato चे डिलीव्हरी बॉय रस्त्यावर दिसतात. पण अलीकडे झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन रस्त्यावरून जात असताना, लोक त्याच्याकडे काहीतरी विचित्र दिसल्यासारखे बघत होते.

वास्तविक, तो डिलिव्हरी बॉय अडीच लाख रुपयांच्या आलिशान बाईकवर डिलीव्हरी पोहोचवायला जात होता. ही बाईक Harley-Davidson X440 आहे जी अतिशय उच्च श्रेणीची मोटरसायकल मानली जाते.

अक्षय शेट्टीगर या इन्स्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, डिलिव्हरी बॉय महागडे हेल्मेट आणि हातमोजे घालून ट्रॅफिकमधून जात असताना पाहिला आणि अनेकांनी त्यावर कमेंट्स देखील केल्या. एका युजरने लिहिले - 'हा डिलिव्हरी बॉय आपली बऱ्यापैकी कमाई गुंतवून बाइक्सची आवड जपत आहे. याचे कौतुक करायला हवे.

काही लोक म्हणाले- ही फूड डिलिव्हरी कंपनीची प्रमोशनल स्ट्रॅटेजी असू शकते. दुसऱ्याने लिहिले - असे दिसते की डिलिव्हरी एजंट संपावर आहेत आणि कंपनीचे संस्थापक दीपंदर गोयल स्वतः त्यांची महागडी बाइक घेऊन डिलिव्हरी देण्यासाठी निघाले आहेत.

काही लोक म्हणाले - हे देखील खरे असू शकते की हे Zomato चे संस्थापक दीपंदर गोयल असू शकतात, जे अधूनमधून आपल्या फावल्या वेळेत ऑर्डर देण्यासाठी बाहेर पडतात. आणखी एकाने कमेंट करत लिहले की – हार्ले-डेव्हिडसन असो किंवा सायकलवर डिलिव्हरी देणं असो, ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर वेळेवर मिळतील याची खात्री करण्यात हे डिलिव्हरी बॉय महत्त्वाची भूमिका बजावतात.

Zomato डिलिव्हरी बॉयशी संबंधित अनेक चांगले आणि वाईट प्रकरणे समोर येत आहेत. काहीही असो, झोमॅटो दररोज चर्चेमध्ये राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT