काश्मिरमध्ये गुंतवणूक करण्यास दुबई तयार असल्याचं याआधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं.
जम्मू काश्मीरमध्ये विकास कामांसाठी दुबईसोबत करार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाकडून या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. या कराराअंतर्गत काश्मीरमध्ये रिअल इस्टेट, इंडस्ट्रियल पार्क, आय़टी टॉवर, बहुउद्देशिय इमारती, वैद्यकीय महाविद्यालये, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इतर विकास कामे करण्यात येणार आहेत.
काश्मिरमध्ये गुंतवणूक करण्यास दुबई तयार असल्याचं याआधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडून सर्व काही सुरुळीत सुरु व्हावं म्हणजे आपण एकमेकांसोबत काम करून अर्थव्यवस्थेला उभारी देऊ. भारत आणि युएई सरकार यांच्यातील संबंध दृढ झाल्यानं भारताला फायदा झाला असंही त्यांनी म्हटलं होतं.
कलम ३५० आणि ३५ ए न्यायालयाने फेटाळून काश्मीरच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर केले होते. आज काश्मीरमध्ये विकास होत आहे. युएई सरकार इथं गुंतवणुकीसाठी इच्छूक आहे. भारतासाठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. भारताच्या भविष्यासाठी हे चांगले संकेत असल्याचं पीयूष गोयल म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.