देश

काश्‍मीरमध्ये ४१ जणांच्या अटकेचा आदेश मागे 

जावेद मात्झी - सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर - उत्तर प्रदेशमधील तुरुंगांमधील ४१ जणांच्या अटकेचा आदेश जम्मू-काश्‍मीर सरकारने मंगळवारी रद्द केला. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तुरुंगांतील गर्दी कमी करणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेतल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले. 

सार्वजनिक सुरक्षा कायद्या (पीएसए) अंतर्गत सध्या ४१ जण उत्तर प्रदेशमधील तुरुंगात आहेत. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा आदेश मागे घेण्याचे जम्मू-काश्‍मीर केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने आज सकाळी ठरविले. कोरोनाचा प्रसार तुरुंगात होऊ नये, यासाठी सात वर्षांहून अधिक काळ कारावासात असलेल्या कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २४ मार्च रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले होते. 

तेरा रुग्ण घरी परतले 
दरम्‍यान, कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर काश्‍मीरमधील १३ जणांना ‘चेस्ट डिसिज’ (सीडी) रुग्णालयात ठेवले होते. विलगीकरणाची मुदत संपल्यावर त्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले, अशी माहिती जम्मू-काश्‍मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ट्विटरवरुन दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT