Vaibhav Suryavanshi takes on Jasprit Bumrah with a fearless six on first ball
Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणारा सामना अखेर १०.१० मिनिटांनी सुरू झाला. पावसामुळे हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर होता, परंतु सव्वा नऊ वाजता पाऊस थांबला आणि ग्राऊंड्समन्सनी प्रचंड मेहनत घेत मैदान सुकवले. हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आणि २० षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. MI चा कर्णधार हार्दिक पांड्या याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे या खेळपट्टीचा अंदाज घेता हार्दिकचा हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे.