RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 MI vs RR Marathi Cricket News : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवत IPL 2026 मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. गुवाहाटी येथे पावसामुळे ११-११ षटकांच्या या सामन्यात RR ने १५१ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले आणि MI चे फलंदाज त्याचा पाठलाग करताना ढेपाळले.
Jaiswal and Vaibhav power RR to dominant win over Mumbai Indians

Jaiswal and Vaibhav power RR to dominant win over Mumbai Indians

Updated on

Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आपली विजयी घोडदौड कायम राखली. पावसामुळे ११-११ षटकांच्या या सामन्यात RR ने गुवाहाटीच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्ससमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले. यशस्वी जैस्वाल ( नाबाद ७७) आणि वैभव सूर्यवंशी ( ३९) यांच्या आक्रमक फटकेबाजीने MI च्या स्टार गोलंदाजांना हतबल केले. त्यानंतर RR च्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना गुंडाळले. राजस्थानने सलग तिसरा विजय मिळवून IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com