Jammu Kashmir Encounter esakal
देश

Jammu Kashmir Encounter: गावात घुसले..पाणी मागितलं मग दिसतील त्यांच्यावर गोळीबार...कठुआमध्ये दहशतवाद्यांचा कहर

Jammu Kashmir Encounter: मंगळवारी हिरानगर सेक्टरमधील सैदा सुखल गावात दहशतवाद्यांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम राबवली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दल अनेक भागात शोधमोहीम राबवत आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना लक्ष्य केले आहे. हिरानगर सेक्टरमधील कुटा मोडजवळील सैदा सुखल गावात काल (मंगळवारी) संध्याकाळी दहशतवाद्यांनी असाच हल्ला केला. येथे दोन सशस्त्र दहशतवादी सैदा सुखल गावात पोहोचले. येथे दहशतवाद्यांनी एका महिलेकडे पाणी मागितले, महिलेला दहशतवाद्यांचा संशय आला आणि तिने पाणी देण्यास नकार दिला.

यानंतर दहशतवादी ओंकार नावाच्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी दारात येताच गोळीबार केला. या हल्ल्यात ओंकार जखमी झाला. यानंतर दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला. येथे बाईकवरून जात असलेल्या जोडप्यावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला, मात्र ते थोडक्यात बचावले. यानंतर दहशतवादी अंधाराचा फायदा घेत तेथून निघून गेले.

यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबारही केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल आणि एक बॅग जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मारला गेलेला दहशतवादी आणि त्याच्या गटाची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी बसवर केला गोळीबार

जम्मू भागात अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच रविवारी पोनी भागातील तेरायथ गावाजवळ शिव खोरी मंदिरापासून कटरा येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर बस खड्ड्यात पडली. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत.

डोडा येथेही चकमक सुरूच

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील चतरगळा भागात दहशतवाद्यांनी ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर गोळीबार केला. ते म्हणाले की, सुरक्षा जवानांनी प्रत्युत्तर दिले, परिणामी चकमक झाली. आतापर्यंत ६ सुरक्षादल जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT