terrorist 
देश

Jammu-Kashmir: यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्याचे स्केच जारी, 20 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा

Sketch of terrorist released: रियासी पोलिसांनी दहशतवाद्यांचं स्केच जारी केलं आहे. तसेच माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 20 लाख रूपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या रियासी भागात झालेल्या यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्यानंतर दहशतवाद्याचा शोध घेण्याची मोहीम सुरूच आहे. याप्रकरणी रियासी पोलिसांनी दहशतवाद्यांचं स्केच जारी केलं आहे. तसेच माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 20 लाख रूपये बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारावर हे स्केच तयार करण्यात आलंय.

दोन दिवसांपूर्वी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर तीन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता. याप्रकरणी तीनपैकी एका दहशतवाद्याचे स्केच समोर आले आहेत. याप्रकरणी २० लाखांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहे. जेणेकरून दहशतवाद्याचा लवकर ठावठिकाणा लागावा. पौनी भागामध्ये यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाला होता. गेल्या काही दिवसांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं जातं.

५३ प्रवाशांना घेऊन एक बस शिव खोरी मंदिरातून वैष्णोदेवी मंदिराकडे जात होती. पौनी भागातील तेरयाथ गावाजवळ आल्यावर तीन दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरु केला. त्यामुळे बस दरीमध्ये कोसळली. यात १० भाविकांचा मृत्यू झालाय, तर ४१ जण जखमी झालेत. बस उत्तर प्रदेशची होती. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आत्यंतिक प्रयत्न केले जात आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ११ टीम काम करत आहेत.

दरम्यान,जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. कठूआमधे सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात रात्रीपासून चकमक सुरू आहे. चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. चकमकीत 5 सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. अद्याप भारतीय सैन्याकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहे. गेल्या तीन दिवसातील दहशतवाद्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT