Attack Sakal
देश

जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला; एक पोलिस कर्मचारी शहीद

हा कर्मचारी कुलगाम पोलिस स्टेशन येथे कामावर तैनात असताना हा हल्ला झाला असल्याचं समोर आलं आहे.

दत्ता लवांडे

जम्मू आणि काश्मीर : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर शनिवारी अज्ञात अतिरेक्यांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल अली मोहद गनी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Terrorist Attack In Jammu Kashmir One Death)

हा कर्मचारी कुलगाम पोलिस स्टेशन येथे कामावर तैनात असताना हा हल्ला झाला असल्याचं समोर आलं आहे. अज्ञात व्यक्तीकडून हल्ला झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने त्या ठिकाणी घेराव घालून शोधमोहीम चालू केली आहे. अजूनपर्यंत अतिरेक्यांचा शोध लागला नसून शोध सुरु असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरच्या याच भागात मागच्या तीन आठवड्यांपूर्वी सुरक्षा दलाच्या चकमकीत एक अतिरेकी ठार केला होता. त्यानंतर आज (शनिवारी) ही घटना घडल्याने परिसरात धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

* सुरक्षा दलाच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील महाराजा बाजार या भागात याआधी सुरक्षा जवानांवर अतिरेक्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झाली नसून एकही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा हल्ला दुपारी साडेचारच्या सुमारास झाला आहे. CRPF आणि पोलिस दलांच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसराची नाकाबंदी केली असून शोधमोहीम चालू असल्याचंही अधिकाऱ्यांनी सागितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : चाकणमधील उद्योजकांच्याअडचणी सोडवण्यासाठी १६ ऑगस्टला बैठक

SCROLL FOR NEXT