Fumio Kishida and Narendra Modi Fumio Kishida and Narendra Modi
देश

Fumio Kishida : PM मोदींच्या भेटीनंतर जपानचे पंतप्रधान अचानक भारतातून युक्रेनला रवाना; नेमकं काय झालं?

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japan PM Fumio Kishida) 20 मार्चपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले.

सकाळ डिजिटल टीम

रशियावर निर्बंध लादण्यात आणि रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यावर युक्रेनला पाठिंबा देण्यामध्ये जपान इतर जी-7 देशांच्या बरोबरीनं काम करत आहे.

कीव : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japan PM Fumio Kishida) 20 मार्चपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले. मात्र, येथून ते अचानक युक्रेनच्या (Ukraine) दौऱ्यावर जात आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये.

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, फुमियो किशिदा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज (मंगळवार) पहाटे कीवला गेले आहेत.

नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्यानंतर, काही तासांनी किशिदा युक्रेनला अचानक भेट देण्यासाठी रवाना झाले. मे महिन्यात होणाऱ्या G-7 शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणारे किशिदा हे एकमेव G-7 नेते आहेत, ज्यांनी युक्रेनला भेट दिली नाही.

रशियावर निर्बंध लादण्यात आणि रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यावर युक्रेनला पाठिंबा देण्यामध्ये जपान इतर जी-7 देशांच्या बरोबरीनं काम करत आहे. किशिदा यांनी झेलेन्स्कीसोबतच्या भेटीत युक्रेनला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेन दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी उभी असल्याचं बायडेन म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT