देश

जारकीहोळी बंधू व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाद पेटणार?

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - जारकीहोळी बंधू व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील वाद अद्यापही धुमसत असून तो पुन्हा उफाळण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. ३०) दावणगेरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, मी कोणाच्या राजकारणात हस्तक्षेप करीत नाही, परंतु काही लोक पुन्हा पुन्हा माझ्या राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत. माझ्या मागे लागल्यास मी गप्प बसणार नाही, असे जारकीहोळी बंधूंचे नाव न घेता त्यांना डिवचणारे वक्तव्य लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

’मी कोणाच्या वाट्याला गेले नाही, जाणारही नाही. उलट मलाच त्रास देण्याचे काम सुरू आहे. मला त्रास दिला तर मी शांत बसणार नाही, राजकारणात तेवढ्याच भक्कम पायावर उभी आहे. माझ्या फंदात कोणी पडले तर मी गप्प राहाणार नाही, असे बोलून यांनी अप्रत्यक्षपणे जारकीहोळी बंधूंवर निशाणा साधला.

बेळगावच्या राजकारणात लक्ष न घालण्याचा सल्ला शिवकुमार यांना पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. अलीकडेच शिवकुमार म्हादई प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबीला आले असता, त्यांचे स्वागत करण्यासाठी हेब्बाळकर गेल्या होत्या. परंतु हेब्बाळकर यांच्याकडे न पाहताच ते निघून गेल्याचे समजते. त्यांची जारकीहोळी बंधूंनीही भेट घेतलेली नाही. शिवकुमार शासकीय भेटीवर आले होते, ते खासगी भेटीवर आले असते तर त्यांची भेट घेतली असती, असे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले असून यावरून जरकीहोळी व शिवकुमार यांच्यातील मतभेद अजून दूर झाले नाहीत हेच 
स्पष्ट होते. 

हेब्बाळकरांना मिळणार डच्चू?
जारकीहोळी बंधूंशी टक्कर घेतल्याने आणि भाजपकडून पक्षांतरासाठी ३० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर आल्याचा गौप्यस्फोट करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्य महिला काँग्रेस अध्यक्षपदावरून डच्चू मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला या पदावरून हटवले जाणे ही फार मोठी बाब नाही. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींशी याचा संबंध जोडणे चुकीचे आहे. पदाधिकारी बदलणे ही नित्याची प्रक्रिया आहे. एकाच व्यक्तीने अनेक वर्ष एखादे पद अडवून बसावे हे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT