देश

केंद्रीय मंत्रिमंडळात आता 'जेडीयू'चा सहभाग नाही : नितीशकुमार

वृत्तसंस्था

पाटणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर येथे आल्यावर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. 

मोदी मंत्रिमंडळात "जेडीयू'ला तीन मंत्रिपदे अपेक्षित होती. पण, ती न मिळाल्यामुळे नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच, पक्षाच्या खासदारांच्या संख्याबळाच्या तुलनेत मंत्रिपद न मिळणे, हेही एक कारण आहे. याबद्दल बोलताना, "अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना पक्षाच्या खासदारसंख्येच्या आधारावर मंत्रिपद मिळत होते. पण, केंद्रात भाजपला एकट्याला बहुमत असल्यामुळे आता तसे होणार नाही,' असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले. 

"जेडीयू'चे लोकसभेत सोळा आणि राज्यसभेत सहा, असे एकूण 22 खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय हा पक्षाचा असल्यामुळे याबद्दल वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून ते म्हणाले, की याविषयी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. 

मंत्रिपदाच्या मुद्द्यावरून राज्यातील भाजप आणि जेडीयू यांच्या आघाडीवर काही परिणाम होईल का, या प्रश्‍नावर नितीशकुमार म्हणाले, की राज्यातील सरकार आम्ही भाजपसोबत मिळून चालवत आहोत. त्यामुळे याचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांत कटुता निर्माण होऊ शकते, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT