BJP 
देश

झारखंडमध्ये चारही विभागांतील महत्त्वाच्या जागा भाजपने गमावल्या

उज्वलकुमार

पाटणा - झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्याने सत्ताधारी भाजपला धूळ चारल्याने कमळ कोमजले. राज्याचे चार विभाग केले तर तेथे सर्व ठिकाणी भाजपला विरोधी पक्षांपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. 

जमशेदपूर शहरातील दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पूर्व जमशेदपूर मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री रघुवर दास यांना भाजपचे बंडखोर नेते शरयू राय यांच्याकडून हार पत्करावी लागली.  झारखंडचे भौगोलिक क्षेत्र चार हिश्‍श्‍यात विभागले गेले आहे. कोल्हान, संताल परगणा कोयलांचल आणि छोटा नागपूर या चार विभागांत झारखंड सामवला आहे. जमशेदपूरचा समावेश कोल्हानमध्ये होतो. या क्षेत्रात विधानसभेचे १४ मतदारसंघ आहेत. या पैकी एकाही जागेवर भाजप विजय मिळवू शकला नाही.  येथे या वेळी ‘जेएमएम’च्या जागांमध्ये वाढ झाल्याचे कारण म्हणजे या भागातील कारखान्यांवरील मंदीचे सावट असल्याचे जाणकार सांगतात. जमशेदपूरमध्ये टाटांच्या कारखान्यांत गेल्या काही दिवसांपासून काम बंद आहे. त्याचा परिणाम तेथील जनतेवर झाला आहे. रघुवर दास हेही पूर्वी ‘टिस्को’मध्ये कामगार होतो. 

संताल परगण्यातही भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. या भागात एकूण १८ जागा आहेत. या वेळच्या निवडणुकीत पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. गेल्या वेळी त्यांना सात ठिकाणी यश मिळाले होते. गेल्या निवडणुकीत महाआघाडीला येथून १२ जागा मिळाल्या होत्या. कोयलांचलमध्ये १६ विधानसभा मतदारसंघ आहेत. येथे ‘जेएमएम’ला चार आणि काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळाला. भाजपच्या पदरी केवळ सहाच जागा आल्या. कोयलांचलमधील एका मतदारसंघावर वर्चस्व राखण्यात कम्युनिस्ट पक्ष यशस्वी ठरला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT