Manipur Violecne 
देश

Manipur Violence: शांतता कराराचे 24 तासांत वाजले बारा! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, अनेक घरांची जाळपोळ

Jibram Violence: गेल्या वर्षी मे पासून, मेईतेई आणि इम्फाळ खोऱ्याच्या आसपासच्या डोंगराळ भागात असलेल्या कुकी-जो गटांमधील जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो बेघर झाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

एकीकडे, मणिपूरच्या जिरिबाममध्ये शांतता राखण्यासाठी मेतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. पण करारानंतर 24 तासांत जिरीबाममध्ये हिंसाचार उसळला आहे. येथे मेईतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या असून, लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.

खरं तर, मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मेईतेई आणि हमार समुदायांच्या प्रतिनिधींनी एकत्र काम करण्याचे मान्य केले होते.

गुरुवारी आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता.

या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा निर्णय घेण्यात आला.

या करारानंतर 24 तासांच्या आत जिरीबामच्या लालपाणी गावात हिंसाचार झाला. शुक्रवारी रात्री सशस्त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली. गावाला लक्ष्य करत गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या.

या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत हल्लेखोरांनी जाळपोळ केली.

गेल्या वर्षी मे पासून, मेईतेई आणि इम्फाळ खोऱ्याच्या आसपासच्या डोंगराळ भागात असलेल्या कुकी-जो गटांमधील जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो बेघर झाले आहेत.

वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिरीबाममध्ये वांशिक हिंसाचाराचा मोठा फटका बसला नाही. मात्र, यावर्षी जूनमध्ये शेतात एका शेतकऱ्याचा विकृत मृतदेह आढळल्यानंतर येथेही हिंसाचार सुरू झाला.

दोन्ही बाजूंनी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये जावे लागले. येथे जुलैच्या मध्यात दहशतवाद्यांनी गस्तीदरम्यान सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. यावेळी एका सीआरपीएफ जवानाला प्राण गमवावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT