JNU Red Salute N Sai Balaji elected as president
JNU Red Salute N Sai Balaji elected as president 
देश

जेएनयूत 'लाल सलाम' ; एन. साई बालाजी अध्यक्षपदी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी'ला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे डाव्या संघटनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार एन. साई बालाजी यांची विद्यार्थी संघनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

याशिवाय विद्यार्थी संघटनेच्या चारही पदांवर डाव्या संघटनेने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) सर्व उमेदवारांचा पराभव झाला. तर 'बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन' तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे जेएनयूमध्ये पुन्हा एकदा 'लाल सलाम'च्या घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीदरम्यान शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे येथे मतमोजणी थांबविण्यात आली होती. मात्र, आज येथे तणावपूर्ण परिस्थितीत मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

दरम्यान, 'जेएनयू' विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी (ता.14) मतदान झाले होते. त्यानंतर शनिवार मतमोजणीला सुरवात झाली. या मतमोजणीदरम्यान गदारोळ झाला. मतपेट्या पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि तोडफोडही करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT