Jyoti Malhotra Pakistani Spy Mobile Secrets esakal
देश

Jyoti Malhotra Pakistan : ‘बिल्लो तेरी आंख कतल’चा कोड…ज्योती मल्होत्राने तिच्या फोनमध्ये पाकिस्तानी हँडलर्सची गुपिते कशी लपवली?

Jyoti Malhotra Pakistani Spy Mobile Secrets : युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानच्या हँडलर्सला दिली होती.

Saisimran Ghashi

Jyoti Malhotra Latest Update : ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानातील ब्लॉग आणि इंस्टाग्रामवर लक्झरी हॉटेल्समधील स्टायलिश फोटो शेअर करणारी ज्योती मल्होत्रा…सोशल मीडियावर अनेकांच्या डोळ्यात भरली होती. पण आता हेच नाव पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे. एखाद्या फिल्मी स्टोरी सारखी वाटणारी ही गोष्ट आता भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडली गेली आहे.

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

हरियाणातील हिसारच्या 55 यार्डच्या छोट्या घरातून आलेली ज्योती यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरून पैसे कमवत होती. तिच्याकडे कोणतेही स्थिर काम नव्हते तरीही ती फर्स्ट क्लासने प्रवास करत होती, फाइव स्टार हॉटेलात राहत होती आणि अत्यंत महागड्या ठिकाणी जेवण करत होती.

पोलिस तपासात धक्कादायक खुलासे झाले ती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी थेट संपर्कात होती आणि हे सगळं एक-दोन वेळचं नव्हतं.

'जट्ट रंधावा'च सिक्रेट काय?

तपासात उघड झालं की, ज्योतीनं आपल्या पाकिस्तानी हँडलर्सचे नंबर तिच्या फोनमध्ये 'जट्ट रंधावा' यांसारख्या बनावट नावांनी सेव्ह केले होते. ही केवळ सावधगिरी नव्हती तर तिच्या सुनियोजित हेरगिरीच्या नेटवर्कचा भाग होता. ती व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या एन्क्रिप्टेड अ‍ॅप्सवरून गुप्त माहिती शेअर करत होती.

'बिल्लो तेरी आंख कतल'

३० एप्रिल २०२५ रोजी तिने बालीमध्ये काढलेला फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला. कॅप्शनमध्ये लिहिलं होतं "रंधावा जी म्हणाले ,बिल्लो तेरी आंख कतल". हा फोटो तिच्या पाकिस्तानी हँडलरशी संपर्क असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ६ मे रोजी ती दिल्लीला परतली आणि काही दिवसांतच तिच्या अटकेची कारवाई झाली.

पाकिस्तानशी स्ट्रॉंग नेटवर्क

ती किमान तीन पाकिस्तानी हँडलरशी संपर्कात होती. तिचा पहिला संपर्क दानिश नावाच्या अधिकाऱ्याशी झाला जो पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतावासात होता. याच दानिशला १३ मे रोजी भारताने हेरगिरीच्या आरोपाखाली देशाबाहेर पाठवलं. त्यानेच ज्योतीची ओळख इतर पाकिस्तानी हँडलर्स शाकीर, राणा शाहबाज आणि अली अहसानशी करून दिली. अलीने तिला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्कात आणलं.

सोशल मीडियाचा गैरवापर

ज्योतीच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ चॅनलला यूट्यूबवर ३.२ लाख सब्स्क्राइबर्स आहेत तर इंस्टाग्रामवर १३ लाख फॉलोअर्स. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तिने सोशल मीडियाचा वापर केवळ प्रवास दाखवण्यासाठी नव्हे, तर पाकिस्तानप्रेमी भावना पसरवण्यासाठी केला. तिच्या प्रत्येक पोस्टमागे एक हिडन अजेंडा होता.

ज्योतीची शेवटची पाकिस्तान भेट ‘ऑपरेशन सिंदूर’च्या एक दिवस आधी झाली होती. ही गोष्ट केवळ योगायोग नाही, असं गृहित धरून तपास एजन्सी आता अधिक खोलात तपास करत आहेत. तिच्या मोबाईल, लॅपटॉप आणि व्यवहारांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. यामध्ये निधी कोठून आली, कोणी दिली आणि कोणत्या बदल्यात हे सर्व तपासलं जात आहे.

ज्योती मल्होत्राला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर संस्था आणि राज्य पथके तिच्याकडे कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT