jyotiraditya sindhiya.jpg
jyotiraditya sindhiya.jpg 
देश

ज्योतिरादित्य शिंदे यांचं मराठीतून भाषण; पुण्यातील लहानपणीच्या आठवणींना दिला उजाळा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय उड्डयन मंत्री आणि भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील जनतेशी संवाद साधला. विशेष म्हणजे शिंदे यांनी मराठीतून भाषण करत लहानपणीच्या पुण्यातील आठवणींना उजाळा दिला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Jyotiraditya Scindia news in Marathi)

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, पुण्याशी माझा जवळून संबंध आहे. या शहरातील माझ्या खूप आठणी आहे. महादजी महाराजांच्या छत्री येथे दर्शन करायला, पदमविलास महल तसेच मांजरी फार्म आमचं होतं. हॉर्स रेसिंगसाठी दर शनिवारी आणि रविवारी आई-वडिलांसोबत यायचो. त्यावेळी हा आमचा दर शनिवार, रविवारचा कार्यक्रम असायचा, या आठवणी आहे.

पुण्याची एक वेगळी जवळीक आहे. मी विश्वास देतो की, तुम्ही जेव्हा सेवा करण्याची संधी द्याल तेव्हा मी सेवा करणारच, असही शिंदे यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यातच आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे आहे. त्यामुळे आज पुण्यात राजकीय नेत्यांची मादिळायी पाहायला मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT