kamlnath and jyotiraditya shinde 
देश

'मी कुत्रा आहे'च्या ज्योतिरादित्यांच्या वक्तव्यावर कमलनाथ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- शनिवारी सभेदरम्यान ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की अशोक नगरमध्ये मी त्यांना कुत्रा म्हणालो आहे. पण, मी त्यांचा कधीही कुत्रा असा उल्लेख केला नाही आणि करणारही नाही. अशोक नगरचे लोक याला साक्ष आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली आहे. शनिवारी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना कुत्रा म्हणल्याचा आरोपा केला होता. शिंदे यांनी याला जोरदार प्रत्युत्तरही दिलं होतं. 

कमलनाथ म्हणतात मी कुत्रा आहे. होय, मी कुत्रा आहे. माझी मालक जनता आहे आणि मी त्यांची सेवा करतो. हो, कमलनाथजी मी कुत्रा आहे, कारण कुत्रा आपला मालक आणि आपल्या दात्याची सेवा आणि सुरक्षा करतो. हो, मी कुत्रा आहे, कारण कोणी जर माझ्या मालकाकडे बोट दाखवेल आणि मालकासोबत भ्रष्टाचार आणि अयोग्य निती वापरेल तर कुत्रा नक्कीच चावणार, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी पलटवार केला होता. 

कमलनाथ यांनी एका निवडणूक प्रचारादरम्यान शिवराज सिंग चौहान सरकारमधील एका महिला विकास मंत्र्याला 'आयटम' म्हटले होते. तेव्हापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर कारवाई करत त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी निवडणुक आयोगाच्या या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक प्रचाराला दोन दिवस शिल्लक राहिले असताना निवडणूक आयोगाने कारवाई का केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT