अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यात दिवसेंदिवस मोठी घट होतेय. त्यामुळं अकोला महापालिकेने आजपासून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरातील पाणीपुरवठ्याचे अंतर आणखी वाढवण्याचा हा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या 7 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 10 दिवसाआड करण्यात येणार आहे. हे नवीन वेळापत्रक आज 4 ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.