Crime Video News
Crime Video News 
देश

Crime Video: बायको आत्महत्या करत होती, तो व्हीडिओ बनवत होता...

संतोष कानडे

Kanpur, Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक विवाहित महिला फाशी घेऊन आत्महत्या करत होती. मात्र तिचा नवरा चक्क व्हीडिओ काढत होता. अखेर या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे.

कानपूर येथील हनुमंत विहार पोलिस ठाण्यात हद्दीत ही घटना घडली. येथील संजीव गुप्ता हे खाजगी कंपनीत जॉब करतात. चार वर्षांपूर्वी त्यांचं लग्न राज किशोर गुप्ता यांची मुलगी शोभिता हिच्याशी झालं. मागील काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. काल मंगळवारी शोभिताने पतीसमोरच आत्महत्या केली. संजीवने तिला रोखण्याऐवजी चक्क घटनेचा व्हीडिओ केला. शोभिताने आत्महत्या केल्यानंतर संजीवने सासऱ्याला फोन लावून शोभिताने आत्महत्या केल्याचं सांगितलं.

मृत शोभिताचे वडील राज किशोर यांनी सांगितलं की, जावई संजीव यांचा मंगळवारी दुपारी फोन आला. शोभिताने आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा शोभिताचं पार्थिव जमिनीवर होतं. संजीवला याबाबत विचारल्यानंतर त्याने व्हीडिओ दाखवल्याचं राज किशोर गुप्ता यांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये महिला खूर्चीवर चढत पंख्याला फाशी घेत आहे. या व्हीडिओमध्ये संजीव, ''तू असंच करणार, कारण तुझे विचार असेच आहेत.'' असं म्हणत आहे.

पोलिसांनी पती संजीवला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या घटनेने कानपूरमध्ये खळबळ उडाली असून व्हीडिओदेखील व्हायरल होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT