Kawanriya Yatra 
देश

Kanwar Yatra: 'कावड यात्रा'मार्गात दुकानांवर मालकांची नाव का लिहायला लावली? योगी सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर

सुप्रीम कोर्टात काल कावड यात्रा प्रकरणी सुनावणी पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कावड यात्रा मार्गातील दुकानांवर दुकानाच्या मालकांची नावं मोठे बॅनर लावून लावायची सक्ती उत्तर प्रदेशह, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश सरकारनं केली होती. या तिन्ही सरकारांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं नुकतीच स्थगिती देत त्यांना कारणा दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटीशीवर उत्तर देताना योगी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीपूर्वी नवीन प्रतिज्ञापत्रात, यूपी सरकारनं सांगितलं की कावडीयांच्या तक्रारींनंतर हा आदेश आणण्यात आला होता. प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, कावड मार्गातील भाविकांच्या जेवणाबाबत पारदर्शका यावी तसंच त्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन या कालावधीत खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाबाबत योग्य अन्न निवडण्यात अडचण होऊ नये यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या यात्रेत मोठ्या संख्येनं हिंदू भाविक सहभागी होत असल्यानं आणि जातीय तणावाची शक्यता लक्षात घेता यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं हे या निर्देशांचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, सोमवारी एका अंतरिम आदेशात सुप्रीम कोर्टात कावड यात्रा मार्गावरील भोजनालयांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निर्देशांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. याप्रकरणी असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) या एनजीओसह इतर अनेकांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. या याचिकांवरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT