Kareena Kapoor
Kareena Kapoor 
देश

राजकारणात उतरण्याचा माझा विचार नाही : करिना कपूर

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर खान हिने आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘राजकारणात उतरण्याचा माझा कोणताही विचार नाही, केवळ अभिनयावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे’.

करिनाने काँग्रेसकडून भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. ‘चित्रपट हेच माझे ध्येय आहे, मी निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे. मला कोणत्याही पक्षाने निवडणुकीबाबत विचारणा केलेली नाही’, असे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने स्पष्ट केले आहे.

‘भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून झाली आहे, परिणामी जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो.

महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, त्यामुळे करिनाला उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. पण आता खुद्द करिनानेच आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT