PM Narendra Modi_Kargil Vijay Diwas 
देश

Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिनानिमित्त PM मोदींचा पाकला इशारा; म्हणाले, आता पूर्ण क्षमतेनं....

कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरच्या द्रास इथल्या कारगिल वॉल मेमोरियलला भेट दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता, याला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या द्रास इथं कारगिल वॉर मेमोरियलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली तसंच पाकिस्तानला एक इशाराही दिला.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवण्याला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. पण इथल्या दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत, सातत्यानं इथं अनेकदा दहशतवादी हल्ले होत आहेत. यामध्ये भारतीय जवानांना हौतात्म पत्करावं लागत आहे. यापार्श्वभूमीवर आज द्रास इथं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे.

कारगिल वॉर मेमोरिअल येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने 25 वर्षांपूर्वी कारगिल युद्ध केवळ जिंकलं नाही, तर 'सत्य, संयम आणि सामर्थ्या'चं दर्शन घडवलं आहे. भूतकाळातील सर्व नापाक प्रयत्नांमध्ये पाकिस्तान अयशस्वी ठरला होता, पण आता दहशतवाद आणि प्रॉक्सी अर्थात तिसऱ्याच्या मदतीनं भारताविरुद्ध कारस्थानं करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तान आपल्या इतिहासातून काहीही शिकलेला नाही. आज मी अशा ठिकाणाहून बोलत आहे जिथं दहशतवादाचे सूत्रधार थेट माझा आवाज ऐकू शकतील. मला दहशतवादाच्या या समर्थकांना सांगायचे आहे की, त्यांचे नापाक इरादे कधीच सफल होणार नाहीत. आमचे सैनिक दहशतवादाला चिरडून टाकतील. पूर्ण ताकदीने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT