देश

हे खपवून घेणार नाही; ऑस्ट्रेलियाने भारतीय तरुणाला धाडलं मायदेशी

सकाळ डिजिटल टीम

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जून महिन्यात ऑस्ट्रेलियन एजन्सीजकडे जूडच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.

ऑस्ट्रेलियात शीखांवर हल्ला करणाऱ्या विशाल जूड याला भारतात सोडण्यात आलं आहे. २५ वर्षीय विशाल जूडला शीखांवर हल्ल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातील तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आलं आहे. एकदा नव्हे तर अनेकदा त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियात शीखांवर झालेल्या हल्ल्याने तिथलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. काही लोकांनी असा दावा केला की विशाल जूड याने फक्त खलिस्तानी समर्थकांवर हल्ले केले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जून महिन्यात ऑस्ट्रेलियन एजन्सीजकडे जूडच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. विशाल जूडच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी आंदोलनसुद्धा केलं होतं. खोट्या आरोपाखाली खलिस्तान समर्थकांनी विशाल जूडला अडकवलं असल्याचा दावा त्यांनी केला होता.

विशाल जूड याला भारतात पाठवताना ऑस्ट्रेलियाचे मंत्री अॅलेन हॉक यांनी कठोर शब्दात सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं की, सामाजिक एकतेचं वातावऱण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सांप्रदायिकता आणि अशा गोष्टींच्या विरोधात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचे आभारसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्यांनी मानले आहेत.

दरम्यान, मूळचा हरयाणाचा असलेला विशाल जूड हा घरी परतला आहे. त्याला १२ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याला रविवारी भारतात पाठवण्यात आले. त्यानंतर विशाल जूड हा त्याच्या गावी कर्नाल इथे पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT