देश

८५ वर्षीय महिला जंगलात झाली बेपत्ता; अन्नाविना दोन रात्रींचा थरार अन् असा लागला शोध

सकाळ डिजिटल टीम

Karnataka News : कर्नाटकातल्या होसानगर तालुक्यातील सदगल गावामधून एक ८५ वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. जंगलामध्ये हरवलेल्या या महिलेला दोन रात्री अन्न-पाण्याविना घालवाव्या लागल्या. ५ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झालेली ही महिला ७ नोव्हेंबर रोजी जंगलामध्ये सहा किलोमीटर अंतरावर आढळून आली.

या दोन दिवसांमध्ये तिने मुसळधार पावसाला तोंड देत आणि बिगरनिवाऱ्याची रात्र काढली. स्थानिकांनी तिचा शोध घेतल्यानंतर तिला रुग्णावाहिकेतून नागारा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते.

सदरील महिलेचं नाव शारदम्मा असं आहे. तिचा पती चेन्नापा गौडा आणि मुलगा जयशील यांच्यासोबत ती सदगल येथे राहाते. ५ तारखेला दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान शारदम्मा ही शेतात घुसलेल्या रानटी गुरांच्या मागे गेली होती. त्यानंतर ती जंगलात बेपत्ता झाली. सायंकाळी ती घरात परतली नसल्याने तिचा शोध सुरु झाला. तब्बल दोन दिवस हे शोधकार्य सुरु होते. विशेष म्हणजे तिच्यासोबत असलेला तिचा पाळीव कुत्रा माघारी परतल्यामुळे सर्वांनाच तिच्याविषयी काळजी वाटू लागली.

७ नोव्हेंबर रोजी पोलिस, वन विभागाचे अधिकारी आणि गावकऱ्यांनी शोध घेतला आणि ती सापडली. शिवमोग्गाचे पोलिस अधीक्षक जीके मिथुन कुमार यांनी श्वान पथक शोधकार्यासाठी पाठवले होते. त्यामुळे शारदाम्मा घरापासून सहा किलोमीटर अंतरावर सापडली.

तिच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, तिची प्रकृती चांगली आहे. भटक्या गुरांच्या पाठलाग करताना ती शेतात हरपली. त्यामुळे तिला तिथेच दोन रात्री घालवाव्या लागल्या. ती कशी जगली असेल, याचं आश्चर्य आहे. परंतु आता सगळं ठिक असल्याचं कुटुंबियांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT