Karnataka ex BJP minister G Janardhana Reddy arrested in bribery case
Karnataka ex BJP minister G Janardhana Reddy arrested in bribery case 
देश

लाचप्रकरणी भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना अटक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी यांना आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने अटक केली. रेड्डी यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी अली खान यांनाही पोलिसांनी अटक केली. 

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले जनार्दन रेड्डी काल (शनिवार) सायंकाळी बंगळूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाले होते. तत्पूर्वी गुन्हे शाखेनेच मागील रविवारी रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानांवर छापे टाकल्यानंतर त्यांच्याविरोधात नोटीस बजावली होती; तसेच त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासदेखील सांगण्यात आले होते. त्यानुसार ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 

याबाबत सीसीबीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अलोककुमार यांनी सांगितले, की ''सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आम्ही रेड्डी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही त्यांना सत्र न्यायालयात हजर करणार आहोत. गुंतवणुदारांचे पैसे परत मिळविण्यासाठी आम्ही तपास सुरु केला आहे''.

काय आहे हे प्रकरण ?

'ऍम्बिडंट ग्रुप' या खासगी उद्योगसमूहाच्या मालकाने रेड्डी यांच्यावर 18 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून सुटका करण्याचे आमिष दाखवून रेड्डी यांनी पैसे लाटले होते. हे पैसे रेड्डी यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आले होते, असे या समूहाच्या मालकाने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT