Karnataka Hijab Controversy News esakal
देश

हिजाब वादामागं काँग्रेसचा 'हात'? भाजपचा गंभीर आरोप, वकील संतापले

सकाळ डिजिटल टीम

'समाजांत फुट पाडण्याचं कारस्थान काँग्रेसकडून केलंय जातंय.'

Karnataka Hijab Controversy : हिजाबच्या वादावरून (Karnataka Hijab Disputes) कर्नाटकात राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष (Congress Party) आमनेसामने आहेत. कर्नाटक भाजपनं (Karnataka BJP) ट्विट केलंय की, या हिजाब वादामागं काँग्रेसचा तर 'हात' नाही ना? कारण, हायकोर्टात हिजाबच्या बाजूनं युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळं काँग्रेसनंच हा कट रचल्याचा आरोप भाजपनं केलाय. समाजांत फुट पाडण्याचं कारस्थान काँग्रेसकडून केलंय जातंय, असा आरोपही त्यांनी केलाय.

भाजपच्या आरोपाला उत्तर देताना वकील देवदत्त कामत (Adv. Devadatt Kamat) म्हणाले, मी सुदैवानं एका स्वतंत्र देशात राहतोय. याचा मला अभिमान आहे आणि भाजपकडून होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळं माझ्या निवडीवर कोणताही राजकीय पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही, असं त्यांनी नमूद केलंय. भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांनी म्हंटलंय की, 'कर्नाटकात आपण जे काही पाहत आहोत, ते खूप वाईट आहे. धर्माच्या नावाखाली तरुण मुलींना शिक्षणाऐवजी हिजाब निवडण्यास सांगितलं जातंय, हेही चिंताजनक आहे.'

काय आहे वाद?

मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये (Mahatma Gandhi Memorial College) भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यानं तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मुलांचा एक गट मंड्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर या मुलीच्या बाजूनं समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीनं सांगितलं, की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे. ज्या मुलांनी तिला रोखलं, ते बाहेरचे असल्याचा दावा तिनं केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

SCROLL FOR NEXT