Karnataka Crime News esakal
देश

Hindu Girls : हिंदू मुलीसोबत बोलणंच काय, फिरणंही बनलं कठीण; तरुणीसोबत मंदिरात आलेल्या मुस्लिमाला बेदम मारहाण

एका मंदिरात हिंदू अल्पवयीन मुलीसोबत आलेल्या मुस्लिम तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केलीये.

सकाळ डिजिटल टीम

मारहाणीच्या घटनेनंतर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुस्लिम तरुणाविरुध्द सुब्रमण्य पोलिसांत तक्रार दाखल केलीये.

कर्नाटकातील (Karnataka) एका मंदिरात हिंदू अल्पवयीन मुलीसोबत आलेल्या मुस्लिम तरुणाला काही लोकांनी बेदम मारहाण केलीये. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगळुरू जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या कुक्के सुब्रमण्य इथं ही घटना घडलीये. सुब्रमण्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुल्लियाजवळील कल्लुगुंडी इथं राहणारा आफिद (20) हा गुरुवारी एका अल्पवयीन मुलीला घेऊन कुक्के सुब्रमण्य मंदिरात आला होता.

मुलगा आणि मुलगी कुमारधारा नदीजवळ जात असताना काही तरुणांनी त्यांना पाहून विचारपूस केली. मुलगा आणि मुलगी इतर समाजातील असल्याचं समजताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या आफिदला सुल्लिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी सुब्रमण्य पोलिसांनी (Subramanya Police) 10-12 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडं, आफिदचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तो अंडरगारमेंटमध्ये जमिनीवर पडलेला दिसत आहे.

मुस्लिम तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मारहाणीच्या घटनेनंतर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुस्लिम तरुणाविरुध्द सुब्रमण्य पोलिसांत तक्रार दाखल केलीये. केएसआरटीसी बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना आफिदनं मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. आफिद बराच वेळ तिचा पाठलाग करत राहिला आणि तिचा मोबाईल नंबर मागत राहिला. मुलीनं नकार दिल्यानं त्यानं तिला नदीच्या पात्राजवळ नेऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असा वडिलांनी आरोप केलाय.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आफिद विरुद्ध आयपीसीच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 354 (ब) (लैंगिक छळ) आणि कलम 12 (लैंगिक अत्याचार) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT