देश

महाराष्ट्रासाठी पाणी कुठून सोडायचे? - मंत्री शिवकुमार

सकाळन्यूजनेटवर्क

बंगळूर - उत्तर कर्नाटकातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली आहे. मात्र, आता महाराष्ट्र सरकार पाण्यासाठी आमच्याकडून दुसरे पाणी मागत आहे. आम्ही पाणी कुठून सोडायचे, असा प्रश्‍न कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला. ते हुबळीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘कर्नाटकला पाणी सोडण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे आम्ही नाराज झालो आहोत. यासंदर्भात गांभिर्याने विचार करायला हवा. महाराष्ट्र सरकार यापूर्वी पैसे घेऊन पाणी सोडत होते. परंतु, आता पाण्याच्या मोबदल्यात पाण्याची मागणी करण्यात येत आहे. ही मागणी अव्यवहार्य आहे. राजकारण काहीही असले तरी राजकारण्यांनी आपल्या शब्दाचे पालन करायला हवे. त्यामुळे, यापुढे पाणी घ्यायचे असल्यास महाराष्ट्राशी सामंजस्य करारच केला जाईल. तांत्रिक समितीने आता योग्य निर्णय घ्यावयास हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपण कागदी वाघ नाही, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे, असे सांगून मंत्री शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री व भाजप नेते जगदीश शेट्टर यांना चांगलीच समज दिली. डी. के. शिवकुमार कागदी वाघ आहेत. त्यांना विनाकारण हीरो बनविण्यात येत आहे, असे वक्तव्य शेट्टर यांनी केले होते. याबाबत बोलताना त्यांनी शिवकुमार काय आहेत, ते लवकरच कळेल, असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री नरेंद्रस्वामी मंड्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तटस्थ होते. त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, हा काँग्रेस अध्यक्षांच्या अखत्यारीतील विषय आहे. मैत्रीधर्माचे पालन करण्याची सूचना आपण त्यांना केली होती.

ऑपरेशन कमळ होऊ देणार नाही
राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळ होऊ देणार नाही. तशी संधी भाजपला देणार नाही. काँग्रेसचे आमदार हे काँग्रेसमध्ये आहेत. ते कधीही भाजपत जाणार नाहीत, असे शिवकुमार यांनी ठामपणे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT